Ad will apear here
Next
वीर सेवा दलातर्फे पुरातन मंदिरांची स्वच्छता
वीर सेवा दलाच्या वतीने पुरातन मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

कोरोची : वीर सेवा दल प्रांतीय जिल्हा व तालुका समितीच्यावतीने पुरातन मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानांतर्गत भोगोली, इब्राहीमपूर, स्तवनिधी, बांबवडे (धर्मगिरी) टाकवे येथील जैन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. 

इब्राहीमपूर येथील मंदिराच्या सभोवताली पडलेला कचरा काढण्यात आला. निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली. मंदिरांच्या दगडी भिंतींवर व शिखरावर उगवलेले गवत, शेवाळ काढून टाकण्यात आले. यानंतर भोगोली येथील दोन जैन मंदिराची स्वच्छता करण्यात आली.  स्तवनिधी येथे मंदिर परिसराची स्वच्छता करून वृक्षारोपणही करण्यात आले. 

मंदिर स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले वीर सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

सांगली विभागातील प्रांतीय, जिल्हा व तालुका समितीच्यावतीने धर्मगिरी वाटेगाव, बांबवडे, टाकवे येथील जैन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. या वेळी श्री १०८ धर्मसागर महाराज व श्री पार्श्वसागर महाराज यांचे आशीर्वाद लाभले. तन्मय पाटील, चंद्रकांत पाटील, महावीर हिरकुंडे नरेंद्र चौगुले, राहुल कोले, हिराचंद उगारे, अभिराज पाटील यांनी या स्वच्छता मोहिमेत संयोजक म्हणून काम पहिले. प्रांतीय प्रमुख अजित पाटील, प्रांतीय सचिव विजय बरगाले, जिल्हा प्रमुख समोशारण भोकरे, संघटक राजकुमार डोळे, राजू मालगावे, जिल्हा प्रमुख मनोज खोत, संघटक प्रदीप मगदूम, स्वयंसेवक विभाग प्रमुख अभय पाटील, अल्पसंख्यांक विभाग प्रमुख नील गडकरी, शिरोळ तालुका संघटक अनिल पाटील, मध्यवर्ती सदस्य राकेश चौगुले, हातकणंगले तालुका प्रमुख आशिष देसाई, शिरोळ तालुका प्रमुख बाबासो शंभू शेटे, सचिव क्षेत्रपाल मांजरे, जिल्हा सदस्य शीतल पाटील, सुहास पाटील, जयकुमार दरी, हुव्वाणा मजलेकर, विकास गुंडवडे, प्रतिक देसाई, मलगोंडा पाटील, शिवकुमार पाटील, कुलभूषण मासुर्ले, नरेश भोकरे, संतोष चौगुले, महावीर पाटील, वर्धमान पाटील, प्रकाश शिरोळे, सुनील मालगावे, विजय पाटील, संजय पाटील, राजकुमार चिंचवाडे आदींनी या मोहिमेत भाग घेतला होता. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZOXBU
Similar Posts
वीर सेवा दलातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोरोची (कोल्हापूर) : स्वातंत्र्यदिन आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरोची येथील वीर सेवा दल आणि जयसिंगपूर येथील ‘पायोस हॉस्पिटल’ यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कस्तुरबा गांधी बालवाडी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत होणार आहे
‘युवतींनी स्वत:तील क्षमता सिद्ध करावी’ कोरोची : ‘युवतींनी वाईट गोष्टींपासून परावृत्त होऊन आपल्या करियरकडे जास्त लक्ष द्यावे, आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यास जग आपोआप तुमच्याकडे वळेल’, असे मत सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी दिला. आळते येथील युवती सक्षमीकरण शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन सुकुमार पाटील होते
वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेतर्फे वृक्षारोपण कोरोची (कोल्हापूर) : वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेच्या वतीने कोरोची येथील शांतिसागर मैदान व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची ५० रोपे या वेळी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. वृक्षारोपणासाठी कोरोची ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव माने, वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचे क्रीडा
वीर सेवा दलातर्फे कोरोची येथे दुग्धव्यवसाय प्रशिक्षण शिबिर कोल्हापूर : येथील वीर सेवा दल जिल्हा व तालुका समिती आणि वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेतर्फे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत दुग्धव्यवसाय प्रशिक्षण शिबिर कोरोची येथील कस्तुरबा गांधी बालवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करायची आहे. जिल्हा प्रमुख अजित पाटील व जिल्हा सचिव विजय बरगाले यांनी ही माहिती दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language